Thackeray party gets shock in sambhaji nagar: बापरे ठाकरे गटाला ‘या’ ठिकाणी मोठा धक्का! तब्बल येवढे पदाधिकारी करणार …

Thackeray party gets shock in sambhaji nagar

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, १४ नोव्हेंबर २४: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सभेपूर्वीच ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का (Thackeray party gets shock in sambhaji nagar) बसला आहे. माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली असून, त्यांच्यासोबत १०० हून अधिक आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख पदावरून हटविलेले आणि विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी अखेर पक्षाला सोडचिट्टी दिली. लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश (Thackeray party gets shock in sambhaji nagar) करणार आहेत. या कार्यक्रमात आमदार संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितले, “आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे काम सुरू केले होते, त्याच कामाचे पालन आज तनवाणी यांनी केले आहे. बाळासाहेबांच्या विचारांनुसार आम्ही मार्गक्रमण करत आहोत आणि तेही या कार्यात आम्हाला मदत करतील.” यावेळी किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, “एमआयएमचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून मी उमेदवारी मागे घेतली आणि आता शिंदे गटात सामील होत आहे.” तनवाणींच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची ताकद अधिक मजबूत झाली आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर उध्दव ठाकरेंचे महत्त्वाचं भाष्य.. त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर उध्दव ठाकरेंचे महत्त्वाचं भाष्य.. 👈👈

1 thought on “Thackeray party gets shock in sambhaji nagar: बापरे ठाकरे गटाला ‘या’ ठिकाणी मोठा धक्का! तब्बल येवढे पदाधिकारी करणार …”

Leave a Comment