Torres company scam mumbai: बापरे ‘या’ ठिकाणी एका फसव्या कंपनीने लोकांना २०० ते ३०० रुपयांचे खडे हे ६ ते ७ हजारांना विकले

Torres company scam mumbai

WhatsApp Group Join Now

मुंबई, ८ जानेवारी २५: फसव्या योजनांमुळे ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल चर्चेत आलेल्या टोरेस ज्वेलर्सकडून ग्राहकांना बनावट हिरे विकल्याचे समोर आले आहे. साधारण २०० ते ३०० रुपयांचे खडे ६ ते ७ हजार रुपयांना विकण्यात आले होते.

फसवणुकीचा गुन्हा दाखल 

तुर्भे येथील शोरूमच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता विभागाने १० दिवसांपासून या ठिकाणावर लक्ष ठेवले होते. तपास पथकाने बनावट ग्राहक बनून खरेदी केलेल्या हिऱ्यांची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. २०० ते ३०० रुपयांचे खडे ६ ते ७ हजार रुपयांना विकले जात होते. ग्राहकांना हिरे खरेदी केल्यावर ९ टक्के रक्कम बोनस स्वरूपात परत दिली जात होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित झाले. याशिवाय सेमिनारमध्ये दागिने, हिरे खरेदी व गुंतवणुकीतून आठवड्याला मिळणाऱ्या नफ्याची माहिती देऊन गुंतवणूकदारांना फसवले जात होते.

रक्कम विदेशात वळवण्याचा संशय

टोरेस (Torres company scam mumbai) ज्वेलर्समार्फत प्लॅटिनम हर्न कंपनीचे संचालक आणि सदस्य हे संपूर्ण व्यवहार हाताळत होते. त्यानुसार, कंपनीच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये दोन विदेशी आणि एका भारतीयाचा समावेश आहे. गुंतवणूकदारांची रक्कम थेट परदेशात वळवली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी टोरेसने गुंतवणूकदारांसाठी विशेष ऑफर जाहीर केली होती. या आठवड्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कार, मोबाइल भेट देणे आणि ४० ते ६० टक्के बोनस देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे अलिकडच्या १० दिवसांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि खरेदी झाली.

तोडफोडीची घटना

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमवारी संतप्त नागरिकांनी तुर्भे येथील टोरेस (Torres company scam mumbai) ज्वेलर्समध्ये घुसून तोडफोड केली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोरेसच्या फसव्या योजनेमुळे अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोरेसच्या बाहेर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

फसवणुकीचा अनुभव 

अंधेरीत राहणारे पालिका कर्मचारी कैलास जायभाय सांगतात की, टोरेस शोरूमबाहेरील गुंतवणुकीसाठीची गर्दी पाहून त्यांनीही विश्वास ठेवला. भिशीतील मिळालेले पैसे ऑगस्ट महिन्यात टोरेस योजनेत गुंतवले. सुरुवातीला हफ्ते मिळाले, परंतु नंतर हा निर्णय त्यांच्यासाठी त्रासदायक ठरला.

तसेच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनामा दिल्याच्या वृत्तावर काय उत्तर दिले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनामा दिल्याच्या वृत्तावर काय उत्तर दिले? 👈👈

1 thought on “Torres company scam mumbai: बापरे ‘या’ ठिकाणी एका फसव्या कंपनीने लोकांना २०० ते ३०० रुपयांचे खडे हे ६ ते ७ हजारांना विकले”

Leave a Comment