Tukaram bidkar accident news
मूर्तिजापूर, १३ फेब्रुवारी २५: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर शिवरजवळ अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले बाळापूर तालुका मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष राजदत्त मानकर यांचाही अपघातात मृत्यू झाला. माजी आमदार बिडकर (Tukaram bidkar accident news) आणि मानकर हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी शिवणी विमानतळावर गेले होते. भेटीनंतर परत येताना सायंकाळी ४.३० च्या सुमारास शिवर येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांची दुचाकी (क्र. एमएच ३० बीआर ९११०) जनावरे वाहून नेणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली असून, अपघातास कारणीभूत वाहन जप्त करण्यात आले आहे.
प्रा. तुकाराम बिडकर (Tukaram bidkar accident news) हे एक प्रतिभावान खेळाडू होते. कबड्डीमध्ये त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला होता. जय बजरंग व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या कुंभारीसह जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.
राजकीय प्रवासात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतीपदही भूषवले. २००४ मध्ये ते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांच्या सोबत होते आणि आमदार असताना त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला.
प्रा. बिडकर यांनी अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर २०१४ मध्ये *खैरलांजीच्या माथ्यावर*, २०१७ मध्ये *झरी*, आणि २०२२ मध्ये *तू फक्त हो म्हण* यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.
तसेच ५० रुपयांची नोट वापरणाऱ्यांकरता महत्त्वाची बातमी! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Tukaram bidkar accident news: बापरे राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदाराच अपघाती निधन!”