Vinod tawde virar news: विनोद तावडे यांनी तब्बल ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप…

Vinod tawde virar news

WhatsApp Group Join Now

विरार, १९ नोव्हेंबर २४: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. मंगळवारी मतदान होणार असून, मतदानाआधी राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. तावडे (Vinod tawde virar news) यांनी विरार पूर्वेतील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटले, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. या कारणामुळे भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला.

राज्यात विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना अनेक नाट्यमय घटनांची मालिका घडत आहे. बहुजन विकास आघाडीने आरोप केले की मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमधील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते थेट हॉटेलमध्ये प्रवेश करून तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत होते. बहुजन विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, तब्बल पाच कोटी रुपयांचे वाटप केले जात होते. यावर भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यात दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.

या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे (Vinod tawde virar news) यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकूर म्हणाले, “विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन ते पैसे वाटत होते. पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांना दोन डायऱ्या सापडल्या. प्रचार संपल्यानंतर विनोद तावडे मतदारसंघात का आहेत? मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडावा लागतो, हे त्यांना माहीत नाही का?” असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.

ठाकूर यांनी सांगितले की, तावडे (Vinod tawde virar news) यांनी त्यांना २५ वेळा फोन केला आणि “हे प्रकरण ताणू नका, मिटवा” अशी धमकी देत दबाव आणला. दुसरीकडे, भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी विरोधकांवर आरोप करत सांगितले की, पराभव दिसत असल्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत.

तसेच मतदान कार्ड नाहीये? मग ‘या’ ओळखपत्रांचा वापर करून करा मतदान त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बघु शकता.

👉👉 मतदान कार्ड नाहीये? मग ‘या’ ओळखपत्रांचा वापर करून करा मतदान 👈👈

1 thought on “Vinod tawde virar news: विनोद तावडे यांनी तब्बल ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप…”

Leave a Comment