What kind of movement of Mahavikas Aghadi today: महाविकास आघाडीचे आज कोणत्या प्रकारचे आंदोलन?

What kind of movement of Mahavikas Aghadi today

WhatsApp Group Join Now

१ सप्टेंबर २०२४, मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा, राजकोट किल्ल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आज, रविवारी महायुतीविरोधात (What kind of movement of Mahavikas Aghadi today) ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतृत्व शरद पवार आणि काँग्रेस नेते नाना पटोले सहभागी होणार आहेत. आघाडीचे सर्व नेते हुतात्मा चौकात एकत्र येऊन गेट वे ऑफ इंडियाजवळील शिव छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर ‘जोडे मारो’ आंदोलन करतील.

डिसेंबर २०२३ मध्ये राजकोट किल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दु:खी झाले आहेत. शुक्रवारी पालघरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शिवभक्तांची माफी मागितली.असे असले तरी पंतप्रधानांच्या माफीनंतरच महाविकास आघाडीचे नेते सरकारविरोधी आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरदचंद्र पवार यांनी जनतेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून शिवद्रोह्यांना माफी मिळणार नसल्याचे सांगितले. “राजे, आम्ही आलो आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक, महाराष्ट्राचा स्वाभिमान जगवायला,” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तसेच आघाडीतील घटक पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते आंदोलनात सहभागी होतील. रविवारी दुपारी हुतात्मा चौकातून रॅलीला सुरुवात होणार आहे.

तसेच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येवून माफी मागितली त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येवून माफी का मागितली? 👈👈

1 thought on “What kind of movement of Mahavikas Aghadi today: महाविकास आघाडीचे आज कोणत्या प्रकारचे आंदोलन?”

Leave a Comment