When was Tulsi Vivah in 2024
भारत, ११ नोव्हेंबर २४: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह (When was Tulsi Vivah in 2024) हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी तुळशीच्या रोपास नववधूप्रमाणे सजवून पूजा केली जाते आणि शालिग्राम (भगवान विष्णूंचे रूप) यांच्याशी तुळशीचा विवाह केला जातो. हा विवाह प्रदोषकाळ, म्हणजे संध्याकाळी, कार्तिक शुक्ल द्वादशीला पार पडतो. तुळशी विवाहाचा कार्यक्रम कुटुंबात सुख-शांती आणतो आणि दाम्पत्य जीवनात समृद्धी येते, असा विश्वास आहे. तसेच, ज्यांचा विवाह उशिराने होतो, त्यांच्यासाठीही हा सोहळा शुभ मानला जातो. चला तर, यंदा तुळशी विवाह कधी आहे आणि कोणते शुभ योग जुळून आले आहेत, ते पाहूया.
तुळशीचे लग्न ह्या वर्षी कधी आहे? (When Is Tulsi Vivah 2024)
यंदा 12 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा होईल. द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4.04 वाजता सुरू होईल आणि 13 नोव्हेंबरला दुपारी 1.01 वाजता समाप्त होईल. तुळशी विवाह प्रदोषकाळात साजरा केला जातो, म्हणून 12 नोव्हेंबर रोजीच हा सोहळा पार पडावा. या दिवशी एकादशी तिथी देखील आहे. 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5.29 वाजेपासून रात्री 7.53 वाजेपर्यंत प्रदोष काळ असणार आहे, आणि याच वेळेत तुळशी विवाह विधी पार पडावा.
तुलसी विवाहच्या दिवशी कोणते जुळून आले योग
यंदा तुळशी विवाहाच्या (When was Tulsi Vivah in 2024) दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. सकाळी 7.52 वाजता सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल, जो 13 नोव्हेंबर संध्याकाळी 5.40 वाजेपर्यंत चालेल. याच दिवशी रवि योग देखील आहे, जो शुभ कार्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. तसेच, हर्ष योग आणि वज्र योगही आहेत. या दिवशी तुलसी माता आणि शालिग्राम रूपातील भगवान विष्णूंचा विवाह विधिपूर्वक पार पडतो.
तसेच बापरे ‘या’ अभिनेत्याने कोणा करता केलं जोरदार भाषण? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
1 thought on “When was Tulsi Vivah in 2024: ह्या वर्षी तुळशी विवाह कधी आहे?”