Which party will support prakash ambedkars VBA: उद्या निकालानंतर ‘हा’ पक्ष या पक्षाला पाठिंबा देणार!

Which party will support prakash ambedkars VBA

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २२ नोव्हेंबर २४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून, उद्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. अनेक एक्झिट पोल्सनुसार राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापनेमध्ये यशस्वी होईल, तरीही मतदारांचा नेमका निर्णय काय असेल, हे मात्र उद्याच स्पष्ट होईल. महायुती किंवा महाविकास आघाडीला (Which party will support prakash ambedkars VBA) जर सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडल्या, तर अपक्ष आणि इतर लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे.

“उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता असेल, तर आम्ही त्या आघाडीसोबत जाऊ, जी सरकार स्थापन करू शकते,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे, प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला मिळणार, हे उद्याच्या निकालावर आणि कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, यावर निर्भर असणार आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास (Which party will support prakash ambedkars VBA) आघाडीत सहभागी होण्याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी चर्चा केली होती. पण जागावाटपावर समाधान न मिळाल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरायचं ठरवलं. तथापि, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाचे इतर उमेदवार पराभूत झाले. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ हा धोरण स्वीकारला आहे. त्यांच्या या निर्णयाला यश मिळतं की पुन्हा अपयश येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच आजचे राशीभविष्य (२२ नोव्हेंबर २०२४) त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 आजचे राशीभविष्य (२२ नोव्हेंबर २०२४) 👈👈

1 thought on “Which party will support prakash ambedkars VBA: उद्या निकालानंतर ‘हा’ पक्ष या पक्षाला पाठिंबा देणार!”

Leave a Comment