Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
महाराष्ट्र, १८ नोव्हेंबर २४: टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व गाजवत आहे. या शोला 15 पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि त्याच्या काळात अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. शोमधील प्रमुख पात्र दयाबेनने काही वर्षांपूर्वी ‘तारक मेहता’ सोडला, आणि तिच्या परत येण्याची अपेक्षा आजही प्रेक्षकांनी ठेवलेली आहे. याच दरम्यान, काही चर्चा सुरू आहेत की जेठालालही या शोमधून बाहेर जाण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात गंभीर वाद निर्माण झाला आहे.
दिलीप जोशी (Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आणि असित मोदी यांच्यातील वाद फक्त साध्या भांडणापर्यंत मर्यादित न राहता तो हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. यानंतर दिलीप जोशी यांनी शो सोडण्याची धमकी दिली आहे. मागील 15 वर्षांपासून दिलीप जोशी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो करत आहेत. या शोमधील सर्व पात्रे प्रसिद्ध असली तरी, जेठालाल म्हणून दिलीप जोशींनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष ठसा ठोकला आहे. या शोमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता देखील दिलीप जोशीच आहेत.
दिलीप जोशी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर मध्ये झाला. सध्या ते आपल्या पत्नी आणि कुटुंबासह मुंबईत राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी थिएटरमध्ये अभिनय करायला सुरुवात केली, आणि त्यांची पहिली भूमिका पुतळ्याची होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्या नाटकात ते 7-8 मिनिटे पुतळ्यासारखे उभे होते.
दिलीप जोशींना (Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) इंडियन नॅशनल थिएटर अवॉर्ड्समध्ये दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ‘हम पांची एक दाल’ या शोमधून त्यांना टेलिव्हिजनवरील पहिला मोठा ब्रेक मिळाला. यानंतर ते झी टीव्हीच्या ‘जरा हटके’ या शोमध्येही दिसले होते. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती झाली आणि त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले. दिलीप जोशींनी ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’, ‘वन टू का फोर’, आणि ‘दिल है तुम्हारा’ यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. मात्र, या वादानंतर दिलीप जोशी खरोखरच मालिका सोडणार का, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे.
तसेच बापरे फटाके वाजवणं एका उमेदवारांच्या जीवाशी बेतलं! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Will Dilip Joshi exit from Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दयाबेननंतर ‘हा’ मोठा अभिनेता सोडणार का तारक मेहता शो?”